सीवुडस् मध्ये किड्यांचा उच्छाद

नवी मुंबई – नेरूळ भागातील सीवूडस् परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूडस् रेल्वे स्थानकातून सेक्टर नवीन 50 च्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणार्‍या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने नागरिकांच्या शरीराला खाज येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन पडत असून संध्याकाळच्या सुमारास वीजा आणि गडगटासह पाऊसही पडत आहे. या बदललेल्या वातावरणामुळे सिवूडस् परिसरात किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातील काही सोसायट्यांच्या संरक्षण भिंतीवरही हे किडे मोठ्या प्रमाणावर बसले आहेत. तसेच परिसरातील अनेक झाडांवरही या किड्यांनी बस्तान बसवले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा