शुक्रवारी तलाव

शुक्वारी तलाव कोने एके काली तलाव म्हणून ओळखले जाणारे, सध्याच्या काळात गांधी सागर तलाव म्हणून ओळखले जाते. नौकाविहार सुविधांसह, गणेश मंदिर, सभोवताली प्रचंड दगडी भिंती, झाड चांगले अनुभव देतात.

नागपुरच्या महाल भागात असलेला गांधीसागर तलाव हा शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावानेही ओळखला जातो. रमण सायन्स सेंटरच्या अगदी समोर हा तलाव आहे. सुमारे 275 वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन राज्यकर्ते चांद सुल्तान यांच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हा तलाव अस्तित्त्वात आला असल्याचे बोलले जाते. नाग नदीला सोडण्यात येणा-या पाण्यातून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. जलसाठ्याशी संबंधित या तलावाचे नाव जुम्मा तलाव असेही ठेवण्यात आले आहे.