श्री महालक्ष्मीसमोर साकारला ‘जागरण गोंधळ’ हा आकर्षक देखावा

अहमदनगर – गणेशोत्सवानिमित्त घरोघरी श्री महालक्ष्मी बसविण्यात आल्या आहेत. सगळीकडे धार्मिक व उत्साहाचे वातावरण आहे. महिलांनी प्रचंड मेहनत घेऊन श्री महालक्ष्मीसमोर आकर्षक सजावट केली आहे. यामध्ये त्यांचे कुटुंबीयही परिश्रम घेत आहेत. नगरच्या नालेगाव परिसरातील प्रमिला डहाळे व कल्याणी डहाळे परिवारानेही श्री महालक्ष्मीसमोर आकर्षक सजावट केली आहे.

डहाळे परिवाराने यंदा श्री महालक्ष्मीसमोर जागरण गोंधळ हा आकर्षक देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. विविध विषयांवर आधारित देखावे आतापर्यंत दरवर्षी डहाळे कुटुंबियांनी साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून त्यांचा उत्साह वाढविला आहे.

हा देखावा साकारण्यासाठी प्रमिला डहाळे, कल्याणी डहाळे यांच्याबरोबरच दत्तात्रेय डहाळे व सूरज डहाळे यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याची प्रचिती हा देखावा पाहिल्यानंतर तुम्हाला येईल.

प्रमिला डहाळे म्हणाल्या की, हिंदू संस्कृतीनुसार पारंपरिक सण, उत्सव आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो. यामागे सामाजिक जनजागृतीचा हा प्रमुख हेतू असतो. गौरी गणपती हा सण महिलावर्ग उत्साहात साजरा करतात. तीन दिवसांच्या कालावधीत घरामध्ये उत्साही वातावरण असते. प्रत्येकाला गौरी गणपतीची आतुरता असते. या माध्यमातून समाजात जनजागृती उत्तम होऊन परिसरातील महिला एकत्र येतात. विचारांचे आदान-प्रदान होते. प्रत्येकवर्षी वेगळा विषय घेऊन देखावा साकारला जातो. मागील वर्षी आम्ही बारा सण, उत्सव हा देखावा साकारला होता, असे त्या म्हणाल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा