सनफार्मा विद्यालयाचा श्रेयस शेलार 10 वीत प्रथम

अहमदनगर – सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा अहमदनगर औद्योगिक वसाहतीत दहावीचा शैक्षणिक वर्ष 2018-19 या वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल 82.60 टक्के लागला असून शेलार श्रेयस श्रीकांत याने 92.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. कु. चव्हाण अनुज अविनाश याने 82. 80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु. काळे ईश्वरी शेखर हिने 82.20 टक्के मिळून तृतीय क्रमांक मिळवला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. दादाभाऊ कळमकर, उपाध्यक्ष शांताराम गाडे पाटील, सचिव इंजि. बबनराव कातोरे, सर्व संचालक, प्राचार्य रावसाहेब उगले तसेच आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.