शनीदेवालाच नव्हे, महादेव गणपतीलाही वाहतात शमीपत्र

आता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. शिवलिंगावर वेगवेगळ्या वस्तू अर्पित केल्या जातात. शिवपुराणानुसार महादेवाच्या पूजेत फूल, पानांचे विशेष महत्त्व आहे. शिवलिंगावर बेलपान (बिल्वपत्र) सर्वच वाहतात, पण त्याचसोबत महादेवाला शमीचे पानदेखील अर्पित करायला पाहिजे.

खासकरून शमीचे पान शनीला वाहिले जाते, पण हे पान महादेवाला आणि गणपतीलादेखील अर्पित करू शकता. तर जाणून घेऊया शमीच्या झाडाच्या काही खास गोष्टी.

श्रीरामाने केले होते शमीच्या वृक्षाचे पूजन

शमीला पूजनीय मानले जाते, त्याचे एक कारण म्हणजे लंकेवर विजय मिळवल्यानंतर श्रीरामाने शमीच्या वृक्षाचे पूजन केले होते. एका आणखी मान्यतेनुसार महाभारत काळात पांडवांनी आपल्या अज्ञातवासादरम्यान शमीच्या वृक्षात आपली अस्त्रे-शस्त्रे लपविली होती. यामुळे शमीला फार महत्त्व आहे.

असे वाहायला पाहिजे पान

श्रावण महिन्यात रोज सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन तांब्याच्या कलशात गंगाजल किंवा पवित्र जलामध्ये गंगाजल, तांदूळ, पांढरे चंदन मिसळून शिवलिंगावर ‘ॐ नम: शिवाय’ मंत्र म्हणत अर्पित करावे. जल अर्पित केल्यानंतर महादेवाला तांदूळ, बिल्वपत्र, पांढरे वस्त्र, जानवं आणि मिठाईसोबत शमीचे पान अर्पित केले पाहिजे.

शमीचे पान चढवताना हे मंत्र म्हणावे

अमंगलानां च शमनीं शमनीं दुष्कृतस्य च।

दु:स्वप्रनाशिनीं धन्यां प्रपद्येहं शमीं शुभाम।।

शमीपत्र वाहिल्यानंतर महादेवाला धूप, दीप आणि कर्पूराने आरती करून प्रसाद ग्रहण केला पाहिजे. गणपतीच्या पूजेतदेखील तांदूळ, फळ, फूल, शेंदूरसोबत शमीचे पान वाहिले पाहिजे. गणपतीला शमीचे पान वाहताना हे मंत्र बोलाव.

मंत्र-

त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै।

शमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक।।

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा