श्रमिक बालाजी देवस्थानला बोज्जा परिवाराचे मोलाचे सहकार्य – विनोद म्याना

अहमदनगर – नगरमधील श्रमिकनगर परिसरात सर्वात श्रीमंत बालाजींचे मंदिर आहे. नगर शहराबरोबरच देशातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्याने दरवर्षी होणार्‍या ब्रह्मोत्सव उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात. धार्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम ही यानिमित्त आयोजित करण्यात येतात. बालाजी देवस्थानच्या या धार्मिक व सामाजिक कार्यात बोज्जा परिवाराचे मोलाचे योगदान आहे. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी दिलेली 51 हजार रुपयांची देणगी अनमोल आहे, असे प्रतिपादन श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद म्याना यांनी केले.

श्रमिकनगर येथील बालाजी मंदिरात सध्या ट्रस्टच्यावतीने ब्रह्मोत्सव, सामुदायिक विवाह व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व माजी नगरसेविका विणा बोज्जा परिवाराच्यावतीने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 51 हजारांची देणगी सुरेश बोज्जा यांच्या हस्ते ट्रस्टचे अध्यक्ष विनोद म्याना यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी उपाध्यक्ष अशोक इपलपेल्ली, सचिव राजू येमूल, खजिनदार दत्तात्रय कुंटला, सहसचिव लक्ष्मण आकुबत्तीन, ट्रस्टी संजय पेगड्याल, शंकर येमुल, शंकर बत्तीन, अशोक बिटला, श्रमिक सोसायटीचे अध्यक्ष शंकर न्यायपेल्ली, सौ. शशिकला बोज्जा, अरविंद साठे, बालाजी नंदाल, पत्रकार संदिप रोडे आदिंसह भाविक उपस्थित होते.

यावेळी श्रीनिवास बोज्जा म्हणाले, श्रमिक बालाजी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून शहरात होत असलेल्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. सामाजिक बांधिलकी जपत सव्वा रुपयांत विवाह लावून गरीब कुटूंबांना मदतीचा हातभार लावत आहेत.

या कार्याला खारीचा वाटा म्हणून बोज्जा परिवाराच्यावतीने 51 हजार रुपयांची मदत दिली आहे. शहरातील भाविकांनीही या कार्याला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.