लोकशाही बळकटीसाठी मतदार नोंदणी गरजेची – उपनेते अनिल राठोड 

शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ

अहमदनगर- लोकशाहीतील सर्वात महत्वाचा घटक हा मतदार असतो. हेच मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. त्यामुळे मतदार राजाला महत्त्व आहे. सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे. भारतीय घटनेने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचे अधिकार दिलेला असल्याने अशा नवमतदारांनी आपली नावनोंदणी करुन घेणे गरजेचे आहे. मतदार नोंदणीसाठी सरकारी पातळीवर विविध उपययोजना राबविल्या जात असतात. त्याचबरोबरच शिवसेनेच्यावतीने मतदार जागृती आणि मतदार नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपली लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अश्‍विनी मते, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, अमोल येवले, अनिल बोरुडे, श्याम नळकांडे, संजय शेंडगे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, पारुनाथ ढोकळे, रवी वाकळे, अशोक दहिफळे, आशा निंबाळकर, सुभाष पडोळे, संग्राम कोतकर, सुमित कुलकर्णी, विशाल वालकर, मुन्ना भिंगारदिवे, रमेश खेडकर, निर्मला धुपधरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अश्‍विनी मते म्हणाल्या, नवीन मतदारांनी आपली नोंदणी वेळीच केली पाहिजे. त्यामुळे आपण देशाच्या सुज्ञ नागरिक आहोत या लोकशाहीचा आपण घटक बनलेच पाहिजे. आपली नावनोंदणीमुळे आपणास आपल्या भागाचा चांगला लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी देते. शिवसेनेच्यावतीने मतदार नोंदणीचा उपक्रम राबवून नागरिकांची चांगली सोय केली आहे, याचा जरुर फायदा घ्यावा.

याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, युवा सेनेच्यावतीने नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये जास्तीत जास्त युवकांचे नाव मतदार यादीत कसे समाविष्ठ करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी नेता सुभाष चौक येथे ही नोंदणी होणार असून, त्याचबरोबर आपल्या मतदार कार्डवरील चुका दुरुस्ती, स्थलांतरीत, पत्ता बदल असे विविधप्रकारचे बदलही करण्यात येणार आहेत. युवक व नागरिकांनी याचा जरुर फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा