मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर 10 कोटींच्या कामाला मुहूर्त कधी?

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारला बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यास जाब

अहमदनगर – नगर शहरासाठी मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना कामे अद्यापपर्यंत प्रलंबित का आहेत ती तात्काळ का मार्गी लावावी लावली जात नाहीत? असा जाब शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.11) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील राऊत यांची भेट विचारला. दरम्यान यासंदर्भामध्ये उर्वरित कामांचा निधी आणण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही राठोड यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर शहरांमध्ये दहा कोटी रुपयांची कामे करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. ती कामे अद्यापही होऊ शकले नाही, ती व्हावी याकरता गुरुवारी (दि.11) शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, शाम नळकांडे, दत्ता कावरे, उदय अनभुले, यांनी आज कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली, कार्यकारी अभियंता राऊत यांनी आम्ही या संदर्भामध्ये महानगरपालिकेला दोन वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणताही पत्रव्यवहार आमच्याकडे प्राप्त झालेला नाही, दहा कोटी रुपयांची कामे आहेत ती आता साडेबारा कोटी रुपयांवर गेली आहेत, त्यामुळे आपल्याला अडीच कोटी रुपयांचा निधी कमी पडत आहे, त्यामुळे कामे कशी करायची याबद्दल महानगरपालिकेने सांगणे क्रमप्राप्त आहे. मात्र दोन वेळेला यासंदर्भात आम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे तसेच राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ ही कामे करता येतील असेही कार्यकारी अभियंता यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

या चर्चेच्यावेळी बाळासाहेब बोराटे यांनी शहरातील महत्त्वाचे रस्ते यामध्ये घेण्यात आलेले आहे, अद्यापही निविदा प्रक्रिया न झाल्यामुळे ती कामे केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित केला तात्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली मात्र वरील अडीच कोटी रुपयांचा निधी हा आल्यावरच पुढची प्रक्रिया राबवली जाईल असे प्रशासनाच्यावतीने यावेळी सांगण्यात आले, त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, यांनी अडीच कोटी रुपयांचा वाढीव निधी करता आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी करून विषय मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच शहरातील पोलीस मुख्यालयामधील गटारांची झालेली दुरवस्था पाहता ते सुद्धा दुरुस्ती करण्यासंदर्भात मागणी केलेली आहे. कार्यकारी अभियंता यांनी यासंदर्भातली दुरुस्ती निश्चितपणे केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा