शिवाजी महाराजांनी स्वतंत्रता, समता आणि बंधुता तत्त्वावर राज्याची मुहुर्तमेढ रोवली – सुरेश इथापे

जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्यावतीने शिवराज्यभिषेक दिन साजरा

अहमदनगर- स्वतंत्रता, समता आणि बंधुता या तत्त्वावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची मुहुर्तमेढ रोवली. प्रत्येक सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटणारे राज्य व रयतेचा राजा उदयास आला. शिवरायांचे हे एक केवळ मराठ्यांचे बंड नसून सार्वभौम राज्याची स्थापना होती. या राजांच्या कारभाराने समाजाला एक आदर्श प्रस्थापित केल्याची भावना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी व्यक्त केली.

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्यावतीने जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इथापे बोलत होते. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे, संघटक शांता ठुबे, सुनिता झाडे, तालुकाध्यक्ष संचिता गुंजाळ, मिनाक्षी मुनफन, आशाताई गायकवाड, श्रीकांत निंबाळकर, विजय पादीर, राजू सातपुते, केशव हराळ, लगड, सातपुते, कोतकर आदींसह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्या व मराठा सेवा संघाचे युवा सदस्य उपस्थित होते.

अनिता काळे म्हणाल्या की, शिवराज्याभिषेक दिन हा बहुजनांच्या स्वातंत्र्यतेचा दिन आहे. महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना दु:ख आणि संकटांचा भीषण काळोखात सह्याद्रीच्या कुशीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मशाल पेटवली. अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. आजच्या युवकांपुढे असलेले आव्हाने व संकटे शिवरायांच्या आदर्शाने दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा