शिवाची वैशिष्ट्ये

शिवाची तसेच श्रीविष्णूची तीन रूपे

शिवाची तीन रूपे शैव पंथियांचा निर्बीज समाधी अवस्थेतील शिव म्हणजे शिवाचे निर्गुण रूप, म्हणजेच परमेश्‍वर (महाशिव) होय.

त्यांचा ध्यानस्थ शिव म्हणजे ईश्‍वर.

नृत्य करणारा किंवा पार्वतीसह सारीपाट खेळणारा शिव म्हणजे माया होय.

श्रीविष्णूची तीन रूपे वैष्णव पंथियांचा शेषशायी, अनंतशयनी श्रीविष्णू म्हणजे श्रीविष्णूचे निर्गुण रूप, म्हणजेच परमेश्‍वर (महाविष्णू) होय.

त्यांचा भक्‍तवत्सल श्रीविष्णू म्हणजे ईश्‍वर. ल

क्ष्मीसहित श्रीविष्णू म्हणजे माया होय.

निर्गुणातील शिव आणि सगुणातील ध्यानस्थ शिव

शिव हा तत्त्व रूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. जर आॅक्सिजन, नायट्रोजन आदींकडे आपण तत्त्व म्हणून पाहिले, तर त्यांचे गुणधर्म (त्यांच्या अस्तित्वाचे गुणधर्म) ही त्यांची स्थिती असते, त्याप्रमाणे हे आहे. सगुण साधना करणा‍-यांसाठी शिव त्याच्या चित्रातील रूपाप्रमाणे आहे आणि निर्गुण साधना करणा‍-यांसाठी शिवाच्या तत्त्वाची निवळ अनुभूती महत्त्वाची आहे.

शिवाची वैशिष्ट्य

शिवाचा राखाडी रंग – मूळ पांढ-या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत; म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरीरावर असते.

गंगा- व्युत्पत्ती आणि अर्थ व्युत्पत्ती- गमयति भगवत्पदमिति गङ्गा। म्हणजे ‘जी (स्नानकर्त्या जीवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा.

अर्थ – गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिरिति गङ्गा। – शब्दकल्पद्रुम म्हणजे ‘मोक्षार्थी’ अर्थात मुमुक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय.

पृथ्वीवरील गंगा – गंगा नदी हिमालयातील गंगोत्री येथे उगम पावून अनेक उपनद्यांद्वारे बंगालच्या उपसागराला मिळते. हिची एकूण लांबी २५१० कि.मी. आहे. गंगा नदीत आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदूषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते; म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तरी गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे सूक्ष्मातील कळणा‍-यांनाच नाही, तर शास्त्रज्ञांनाही जाणवते.

चंद्र – शिवाच्या मस्तकी चंद्र आहे. चंद्रमा ही ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य (आल्हाद) या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

नाग- नागाला शिवाचे आयुधही समजले जाते. विश्‍वातील नऊ नागांना ‘नवनारायण’ असेही म्हणतात. नवनाथांची उत्पत्ती नऊ नागांपासूनच झाली आहे.

कार्तिकेय, ज्योतिबा, रवळनाथ आणि सब्बु हे नागरूप देव आहेत.

सर्व देवदेवतांच्या रूपात कोणत्यातरी संदर्भात नाग असतो.

नाग हे पुरुषतत्त्वाचे प्रतीक आहे. तो संतानदाता देव आहे.

भस्म- शिवाने सर्वांगाला भस्म लावले आहे. भस्माला ‘शिवाचे वीर्य’ असेही समजतात.

रुद्राक्ष – केसांचा बुचडा, गळा, दंड, मनगटे आणि कटी (कंबर) अशा ठिकाणी शिवाने रुद्राक्षमाळा धारण केल्या आहेत.

व्याघ्रांबर – वाघ (रज-तम गुण) क्रूरतेचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.

तिसरा डोळा शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला डोळा, उजवा डोळा म्हणजे दुसरा डोळा आणि भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. ऊर्ध्व नेत्र हे डावा अन् उजवा अशा दोन्ही डोळ्यांच्या संयुक्‍त शक्‍तीचे प्रतीक आहे आणि अतींद्रिय शक्‍तीचे महापीठ आहे. यालाच ज्योर्तिमठ, व्यासपीठ इत्यादी नावे आहेत.

शिवाचा तिसरा डोळा हा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शिवाच्या चित्रातही तिस‍-या डोळ्याचा आकार ज्योतीसारखा आहे.

शिवाने तिस‍-या डोळ्याने कामदहन केले आहे. (ख‍-या ज्ञानवंतावर झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात. एवढेच नाही, तर खरा ज्ञानी स्वत:च्या ज्ञानाग्नीने कामनांना जाळून टाकतो.) योगशास्त्रानुसार तिसरा डोळा म्हणजे सुषुम्ना नाडी.

शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो.