गूढ महाकाय मानवी शिल्पाचे

सन 1250 ते 1500 दरम्यान प्राचिन पॉलिनेशियातील ‘इस्टर’ बेटावर कोरीव काम करून विशाल मानवी शिल्पे साकारण्यात आली होती. आजही त्या विशालकाय कलाकृती अस्तित्वात आहेत. ही मानवी शिल्पे का साकारण्यात आली आहेत, याचे कारण संशोधकांनी नुकतेच शोधून काढले आहे.

शास्त्रज्ञांचे मतानुसार, प्रचंड शिल्पे तयार करण्यामागील कारण म्हणजे त्या काळातील लोकांना वाटले होते की, अखंड शिल्पांमुळे या भागातील मातीची सुपीकता वाढेल आणि त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. 1995 मध्ये युनेस्कोने या बेटाला ‘जागतिक वारसा स्थळा’ दर्जा दिला. इस्टर बेटाचा बहुतेक संरक्षित भाग हा ‘रेप नुई नॅशनल पार्क’ मध्ये आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी लॉस एंजेलिस (यूसीएलए) च्या संशोधकांच्या मते, मातीची सुपीकता, शेती, उत्खनन इत्यादी संदर्भातील हे पहिले संशोधन आहे. यामध्ये त्या जागेच्या मातीचे प्रामुख्याने संशोधन करण्यात आले. हे संशोधन ‘ऑर्किओलॉजिकल सायन्स’ नामक नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या विशालकाय कलाकृती नॅनो राराकू नावाच्या पॉलिनेशियन बेटाच्या पूर्वेस असलेल्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत.

संशोधक म्हणाले की, रानो राराकू हे स्थान त्या काळी कृषी उत्पादनातही अग्रेसर होते. या संशोधनाचे सह-लेखक जो अॅनी व्हॅन टिलबर्ग यांनी स्पष्ट केले की, आमच्या या संशोधनामुळे अखंड मोनोलिथ्सबद्दलचे आपले ज्ञान वाढवण्यास बळ मिळेल.