9 डिसेंबर पासून श्‍वसन विकार, संधीवातावर तपासणी व उपचार शिबीर

अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये

अहमदनगर- अहमदनगर होमिओपॅथीक शिक्षण संस्थेचे अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल सावेडी रोड येथे दि. 9 ते 14 डिसेंबर पर्यंत सकाळी 9 ते 5.30 या वेळेत श्वसन विकार आणि संधीवात या विकारावर मोफत तपासणी व उपचाराचे शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य व रुग्णालयीन अधिक्षक डॉ. सुनिल पवार यांनी दिली.

सदर शिबीरामध्ये श्वसनाचे विकार आणि संधीवात या विकारांवर सखोल चिकित्सा करुन आजार बरा होईपर्यंत दर आठ दिवसाला मोफत औषधे दिली जातील. शिबीरातंर्गत सर्व रुग्णांची मोफत तपासणी प्राचार्य डॉ. सुनिल पवार, डॉ. देशमुख विद्या, डॉ. मिनल मेहे, डॉ. शकिल सय्यद, डॉ.कल्पना ठुबे, डॉ.थोरात राजेंद्र, डॉ. वैशाली काकडे, डॉ. ज्योती तांबे, डॉ. मिनल सोले, डॉ. संगिता मुसळे, डॉ.शोभना पांडे, डॉ. नाझिमा सय्यद, डॉ. भापकर, डॉ. सौ.भापकर, डॉ.सोनवणे गौरव, डॉ. रिजवान शेख, डॉ. भवर पुनम, डॉ.राजेंद्र वाकळे, डॉ. दिलीप पवार, डॉ. शिल्पा ढोणे, डॉ. निलेश डापसे, डॉ. सोनाली वारे, डॉ. भागवत सुभाष, डॉ. कैलास परदेशी, डॉ. मेधा पगारे, डॉ. सोमेश्वर नरुटे, डॉ. माधुरी मोरे, डॉ.संकेत लांडे हे करणार असुन आजार बरा होईपर्यंत सर्वाना मोफत होमिओपॅथीक औषधे देण्यात येतील. तसेच गरजेनुसार ईसीजी, रक्त, लघवी व सोनोग्राफी व एक्स रे ची तपासणी करुन, या तपासण्यांवर 30 टक्के सवलत दिली जाईल.

तरी सर्व गरजु व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भुषण अनभुले, उपाध्यक्ष भुषण चंगेडे, खजिनदार डॉ. विलास बी. सोनवणे, सचिव डॉ. डी. एस. पवार, सहसचिव लक्ष्मीनिवास सारडा, संचालक बोरा आर. एस., अभय मुथ्था, मदन क्षत्रिय, शिवाजी रणसिंग, डॉ. समीर होळकर, राजेंद्र मेहेत्रे, डॉ. ऋतुजा चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार व आर. एम. ओ. डॉ. मोरे माधुरी यांनी केले आहे.