पं. शौनक अभिषेकी यांचे संगीत रजनीत बहारदार गायन

अहमदनगर- येथील श्री गणेश संगीत विद्यालयाच्या 30 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माऊली सभागृहात झालेल्या संगीत रजनीत पं. शौनक अभिषेकी यांचे बहारदार गायन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं. कल्याण अपार यांचे सनई वादन झाले. त्यांनी पुरीया धनाश्री रागात विलंबित ख्याल नंतर द्रुत तीन तालात गत वाजवून रसिकांची दाद मिळविली. सनई वादनानंतर विद्यालयातील सुमारे 24 विद्यार्थ्यांचे तडफदार समुह तबलावादन सादर झाले.

कार्यक्रमाचा शेवट पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाला. त्यांनी सुरुवातीला मियॉं मल्हार रागातील विलंबित झपतालात ख्याल व द्रुत तीन तालात चिज सादर केली. त्यानंतर त्यांनी रागमाला हा नाविन्यपूर्ण गीत प्रकार सादर करुन रसिकांची मने जिंकली. संत तुकाराम महाराजांचा अभंग गाऊन ‘कैवल्याच्या चांदण्याला’ या भैरवीने मैफिलीची सांगता केली.

पंडित कल्याण अपार व पं.शौनक अभिषेकी यांना राजेंद्र भोसले, संजय हिंगणे, मकरंद खरवंडीकर व अमृता बेडेकर यांनी साथ संगत केली. याच कार्यक्रमात पं.शौनक अभिषेकी यांच्या हस्ते सामाजिक विषयावरील बथुवेल डी. लिखित ‘घट्ट विळखा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमास रसिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्थक डावरे, संदिप नांगरे, बथुवेल हिवाळे, सुशिल क्षत्रिय यांनी विशेष परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा