मेघा पाटकारांच्या समर्थनार्थ राष्ट्र सेवा दलाच्यावतीने निवेदन

अहमदनगर- गेल्या 35 वर्षांपासून नर्मदा घाटीमध्ये धरणग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी चालू असलेल्या नर्मदा बचावच्या कार्यकर्त्यां मेघा पाटकर यांच्या समर्थनार्थ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्र सेवा दल अहमदनगर जिल्हा दक्षिण विभाग व समविचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरुन निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

या निवेदनात विस्थापितांसाठी सातत्याने प्रशासनाने अन्याय केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे. त्यांच्या अनेक मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भातील असंख्य मुद्यावर या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

याप्रसंगी राज्य मंडळ सदस्या सौ.अनघा राऊत, संघटक बापू जोशी, अध्यापक सभेच्या सुरेखा आडम, जिज्ञासाचे विठ्ठल बुलबुले, सोन्याबापू कुसळे, भालचंद्र आपटे, दत्ताजी दिकोंडा, आयुषा जाधव, पुरुषोत्तम जाधव, सागर कोटा आदि उपस्थित होते.

या निवेदनावर राष्ट्र सेवा दल, समाजवादी अध्यापक सभा, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जिज्ञासा अकादमी, युवान, सावली, रेहमत सुलताना फौंडेशन यांच्या समर्थनार्थ सह्या व पाठिंबा आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा