हप्त्यावर घेतलेली गाडी विकताय?

हल्ली कर्जउपलब्धता सुलभ झाल्यामुळे बहुतांश जण वाहनखरेदी हप्त्याने करण्याला प्राधान्य देतात. पण भविष्यात ही गाडी विकायची असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. तुम्ही गाडी जर कर्ज काढून घेतली असेल, तर इतरांच्या नावे ते कर्ज ट्रान्सफर करता येते. पण तुम्हाला यात गाडी दाखवणे, पैसे घेतले, विक्रीनामा, आरसी ट्रान्सफरसह इतर कागदपत्रांवर सही घेतली म्हणजे तुमची गाडी विकली गेली असे नाही. तर तुम्हाला गाडीची विक्री करण्यासाठी विश्वासू आणि योग्य व्यक्तीची निवड करणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि इन्शुअरन्सही गाडी खरेदी करणार्‍याच्या नावे ट्रान्सफर करावे लागते.

कर्जाचे ट्रान्सफर, बँकेची प्रोसेसिंग फी, कार रजिस्ट्रेशन आणि कार इन्शुअरन्स ट्रान्सफर यांसारखे अनेक खर्च गाडी विकणार्‍या व्यक्तीला द्यावे लागतात. कर्ज ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया या खर्चांमुळे फार खर्चिक होते. त्यामुळे हा खर्च गाडी विक्रेता आणि खरेदी करण्यामध्ये विभागला जातो. गाडीचे कर्ज दुसर्‍या व्यक्तीला ट्रान्सफर करण्यापूर्वी कर्जाचे सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्या. तुम्ही कोणत्या व्यक्तीला कर्ज ट्रान्सफर करु शकता, याबाबतची माहिती कर्जाच्या अनेक कागदपत्रांवर दिलेली असते. तुम्हाला जर या कागदपत्रांवर अशाप्रकारची माहिती मिळाली नाही, तर कर्ज घेतलेल्या बँकांशी तुम्ही संपर्क करुन माहिती घेऊ शकता. त्यासोबत याबाबतची अटी, नियम यांचीही माहिती एकदा बँकेतील कर्मचार्‍यांना विचारण्यास विसरु नका. गाडी विक्रेत्या व्यक्तीने गाडी खरेदी करणार्‍या माणसाचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यावा. त्यासोबतच त्याची क्रेडिट हिस्ट्रीही पाहावी.

तसेच वाहन कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी तो व्यक्ती योग्य आहे का याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे. गाडी खरेदी करणार्‍या व्यक्तीचे उत्पन्न, राहण्याचा पत्ता यासारख्या सर्व गोष्टींची माहितीही करुन घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तीला गाडी तुम्ही विकत आहात, सर्वप्रथम बँक त्याचे क्रेडीट मुल्यांकन करते. तो व्यक्ती त्यानुसार खरंच कर्जाची परतफेड करु शकतो का याचीही चौकशी केली जाते. या सर्वांची खात्री पटल्यानंतर गाडीच्या विक्रेत्याला गाडी विकण्यासाठी बँक परवानगी देते. विक्रेत्याने कर्ज ट्रान्सफर करण्यासोबतच आरसी ट्रान्सफर करण्यास विसरु नये.

तुम्ही त्यासाठी एकदा आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करुन ही सर्व प्रक्रिया समजून घ्या. कार ट्रान्सफर प्रक्रियेसाठी आरटीओमध्ये तुम्हाला काही शुल्क आकारले जातात. कर्ज असणार्‍या बँकांकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरसी बूकवर नव्या मालकाचे नाव रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर दिले जाते. आरसी ट्रान्सफर केल्यानंतर मोटर इन्शुअरन्स पॉलिसीही आपोआप नवीन खरेदी करण्याच्या नावे ट्रान्सफर केली जाते. यामुळे नवीन मालकाला येणार्‍या महिन्यातील हफ्ते फेडण्यास कोणताही त्रास होत नाही. तुम्ही जर वापरलेली कार खरेदी करत असाल तर युज्ड वाहन कर्जासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. पण नवीन गाडीच्या तुलनेत बँका जुन्या गाडीवर जादा व्याज आकारतात. अनेक बँका फक्त 5 वर्षांपर्यंतच्या वापरलेल्या गाड्यांवर कर्ज देतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा