किशोर व कुमार गट निवड चाचणी स्पर्धेसाठी 18 ऑगस्टला सहविचार सभा

अहमदनगर- आगामी वर्ष 2019-20 करीता घेण्यात येणार्‍या अहमदनगर किशोर गट मुले/मुली व कुमार गट मुले/मुली संघ निवड चाचणी स्पर्धा तालुका पातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात संघ निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होतील.

या तालुका पातळीवरील निवड चाचणी स्पर्धा दु. 12 वा. रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज येथे आयोजित करण्यासाठी ज्या संस्था/क्लब इच्छुक असतील त्यांनी 18 रोजी संघटनेतर्फे आयोजित सहविचार सभेला उपस्थित रहावे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याचे पंचप्रमुख, पंच मंडळ सर्व सदस्य व जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांनीसुद्धा या सहविचार सभेस उपस्थित रहावे असे आवाहन सेक्रेटरी प्रा.शशिकांत गाडे व जिल्हा पंचप्रमुख प्रा.बाळासाहेब कडूस यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा