सुरक्षेसाठीचा खर्च १५६ कोटी

सबुकने सीईओ मार्क झुकेरबर्ग याच्या सुरक्षेसाठी गेल्यावर्षी 2.26 कोटी डॉलर्स म्हणजेच 156.32 कोटी रुपये खर्च केले आहेत. सुमारे 2 कोटी डॉलर्सची रक्कम झुकेरबर्ग आणि त्याच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी खर्च झाली. 26 लाख डॉलर्स झुकेरबर्गच्या प्रायव्हेट जेटच्या वापरासाठी देण्यात आले. ही रक्कमही सुरक्षा खर्चातच समाविष्ट होती. ‘फेसबुक’ने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली.

2017 मध्ये झुकेरबर्गच्या सुरक्षेचा खर्च 90 लाख डॉलर्स म्हणजेच 62.25 कोटी रुपये इतका होता. एक वर्षात तो 60 टक्के वाढला. अर्थात ‘बेसिक सॅलरी’ म्हणून झुकेरबर्ग गेल्या तीन वर्षांपासून वर्षाला केवळ 1 डॉलरच घेत आहे. सीओओ शेरिल सँडबर्ग यांच्या सुरक्षेसाठी फेसबुकने गेल्यावर्षी 29 लाख डॉलर्स म्हणजेच 20 कोटी रुपये खर्च केले. 9 लाख डॉलर त्यांच्या प्रायव्हेट जेटसाठी दिले. सँडबर्ग यांना वेतन आणि भत्ता म्हणून गेल्यावर्षी 2.37 कोटी डॉलर्स (164 कोटी रुपये) मिळाले. 2017 मध्ये ही रक्कम 2.52 कोटी डॉलर्स (174 कोटी रुपये) होती. फेसबुककडून निवडणुकांमधील दखल आणि डेटाचा चुकीचा वापर करण्याचे प्रकार एक वर्षात बरेच वाढले आहेत. त्यामुळे कंपनीने आपल्या
अधिका-यांच्या सुरक्षेसाठीचा खर्च वाढवला आहे