पिकवण्याबरोबर मार्केटिंग क्षेत्रात शेतकरी उतरल्यास विकास साधला जाणार – गणेश शिंदे 

भूमिपुत्र शेतकरी संघटना द्वितीय वर्धापनदिनाचा उपक्रम

अहमदनगर- आंदोलन करुन प्रश्‍न सुटणार नसून, शेतकर्‍यांनी नवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागणार आहे. पिकवण्याबरोबर मार्केटिंग क्षेत्रात शेतकरी उतरल्यास त्याचा खर्‍या अर्थाने सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. अन्न-धान्य पिकवणारा उपाशी तर विकणारा तुपाशी अशी अवस्था झाली आहे. शेतकर्‍यांच्या घामाला योग्य किंमत मार्केटिंगने मिळणार असल्याची भावना व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केली.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त शेतकरी चळवळी समोरील आव्हाणे व पुढील वाटचाल या विषयावर शिंदे बोलत होते. मार्केटयार्ड शेतकरी निवास येथे झालेल्या या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देऊन, कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी विलास नलगे, किरण वाबळे (प्रदेश सचिव), असिफभाई शेख (प्रदेश उपाध्यक्ष), अशोक आंधळे (राज्य संपर्क प्रमुख), निलेश तळेकर (कार्यकारणी सदस्य), संतोष हांडे (प्रवक्ते), अमोल उगले (युवक जिल्हा अध्यक्ष), संतोष कोरडे (जिल्हा सरचिटणीस), संतोष राम वाडेकर (जिल्हा संपर्क प्रमुख), संतोष वाबळे (जिल्हा संघटक), रोहन आंधळे (पुणे जिल्हा संपर्क प्रमुख), सीताराम देठे, गणेश चौधरी, गणेश जगदाळे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), रोहिदास धुमाळ, राधुजी राऊत आदि उपस्थित होते.

पुढे श्री. शिंदे म्हणाले की, परदेशात शेतकर्‍यांनी माल पाठविल्यास त्याला योग्य भाव मिळणार आहे. यासाठी मार्केटिंग व व्यापार कौशल्याची गरज असून, या क्षेत्राकडे शेतकर्‍यांच्या मुलांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपला विकास साधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटितपणे एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.

संतोष वाडेकर यांनी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची वाटचाल तिसर्‍या वर्षात होत असताना शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी संघटनेची पुढील ध्येय धोरणे स्पष्ट केली. तर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर 1 जूनचा ऐतिहासिक संप, दुध आंदोलन, कांदा प्रश्‍नावरील आंदोलन, ऊस आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालावर भाकड जनावरे बांधून करण्यात आलेले आंदोलनाची माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा आधार म्हणून आज संघटनेकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोहिदास भागवत, बबन कानडे, अण्णासाहेब विष्णुपुरी, पोपट खुळे आदि आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात आली. तर कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे धनंजय धोर्डे, बाळासाहेब पठारे, शरद पवळे, साईनाथ घोरपडे, शरद मरकड, अनिल शेटे, रामदास घावटे, पोपट खोसे, सुभाष चाटे, तुकाराम खेडकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब शिंगोटे यांनी केले. आभार अशोक आंधळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब झांबरे (युवक तालुकाध्यक्ष), सचिन सैद (तालुकाध्यक्ष), गणेश सुपेकर (पाथर्डी तालुकाध्यक्ष), सागर भिंगारे (राहुरी तालुकाध्यक्ष), महेश धाडगे (नेवासा तालुकाध्यक्ष), सुमित गाढवे (राहाता तालुकाध्यक्ष), शरद आहेर, दिनेश शेळके, शिवनाथ औताडे (श्रीरामपूर तालुकाध्यक्ष), नितीन बुरके (संगमनेर तालुकाध्यक्ष), सतिश तनपुरे, संदिप शिंदे, संजय भोर, ज्ञानेश्‍वर गागरे, संजय बेंद्रे, सिताराम देठे, शिवाजी पारधी, सुमित खामकर, सतीश दिवसे, सुरेश ढोले, सचिन इरोळ, आकाश उदागे, अभय हासे, रोहित जाधव, संदीप जाधव, संतोष गागरे, राजू रोकडे, नंदू साळवे, अर्जुन रोकडे, बाळासाहेब वाळुंज, महेंद्र पांढरकर, पांडुरंग पडवळ, किरण खाडे, मंजाबापु वाडेकर, काशिनाथ गोळे, गोरख वाळुंज, विष्णू वाळुंज, दादा रोकडे, दादा शिंदे, संदिप व्यवहारे, नितीन गुंड, संपत तोरकड यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.