जेवताना लक्षात ठेवण्यासारखे काही नियम

जेवताना एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी की, अन्नाचा आपल्या शरीराला पूर्ण फायदा मिळेल. आरोग्य बिघडवणारी कुठलीही गोष्ट खाऊ नये, पण याचबरोबर जेवताना आपल्या आसपासचं वातावरणही शुद्ध असावं. शास्त्रांनुसार जर आपण जेवत असताना एखादा कुत्रा आपल्यासमोर येऊन उभा राहिला आणि आपल्या अन्नाकडे बघत बसला, तर ते अन्न खाऊ नये. कुत्र्याच्या आधाशी नजरेमुळे अन्न अपवित्र होतं. असं अन्न जेवल्यास ते नीट पचत नाही.

कुत्रा अन्नाकडे बघत असल्यास ते संपूर्ण अन्न कुत्र्यालाच खायला घालावं. यामुळे अन्न वाया जाणार नाही आणि कुत्र्याला अन्नदान केल्याचं पुण्यही मिळेल. जेवणाच्या जागेवर कुठलाही कचरा, घाण असू नये. अशुद्ध जागेवर भोजन केल्यास अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. जेवणातील पदार्थांइतकंच आपल्या भोजनाचं स्थानही महत्त्वाचं असतं. ते पवित्र असावं. कारण शास्त्रानुसार अन्नग्रहण हा एक प्रकारचा यज्ञ आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा