पालकांनी मुलांबरोबर संवाद साधून करिअरसाठी प्रोत्साहन द्यावे – प्राचार्या संगीता जोशी 

अहमदनगर- विद्यार्थ्यांनी शाळेत (महाविद्यालमात) जास्तीत जास्त उपस्थित राहून ज्ञान ग्रहण करावे, असे आवाहन प्राचार्या संगीता जोशी यांनी पालकांना केले. पालकांनी आपल्या पाल्याला जाणून घ्यावे व पाल्याशी जास्तीत जास्त संवाद साधून पुढील करिअरसाठी त्यास प्रोत्साहन द्यावे.

श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला (उच्च माध्यमिक), सावेडी या शाळेत इ.11 वी व 12 वी शास्त्र शाखेची शिक्षक-पालक सहविचार सभा संपन्न झाली. त्याप्रसंगी प्राचार्या जोशी बोलत होत्या.

याप्रसंगी शिक्षक-पालक सभेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षा प्राचार्या संगीता जोशी, उपाध्यक्ष – प्रफुल्ल आमले, सचिव – वसुमती कोळंबे, पालक सदस्य – शीतल फलके व अश्विनी कुलकर्णी, शिक्षक सदस्य – शिल्पा कुलकर्णी, वर्षा पाठक-रोडे अशी निवड झाली.

वार्षिक परीक्षांचे नियोजन कल्पना साबळे राजगुरू यांनी सादर केले. प्रास्ताविक प्राजक्ता केसकर यांनी केले. पालकांच्यावतीने मंजुषा देशमुख व अश्विनी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नीलाक्षी केळकर यांनी केले, तर आभार गीतांजली मुटकुळे यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा