सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

अहमदनगर- श्री समर्थ विद्या मंदिर (प्राथमिक), सांगळे गल्ली या शाळेतील विद्यार्थ्यांनी बाई इचरजबाई फिरोदिया आंतरशालेय स्पर्धेत भरघोस यश संपादन केले.

दीक्षा खोलम (नृत्य), किर्ती सप्तर्षी व मानस सप्तर्षी (बोला या विषयी), नक्षत्रा शर्मा (वेशभूषा), अनन्या पाटील (रांगोळी), अमित बेद्रे, तन्मय वडियार (प्रश्नमंजुषा) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी प्र. स. ओहोळ, मुख्याध्यापक अजय महाजन यांनी कौतुक केले.

या विद्यार्थ्यांना गीतांजली शेरकर, सुनीता पांडव, सविता येवले, स्वाती मुळे, हेमलता शिंदे, संगीता पारखे, प्रमिला अल्हाट, बाबासाहेब वाव्हळ व सर्व शिक्षकवृंदांनी मार्गदर्शन केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा