महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता साळवे यांची आत्महत्या

अहमदनगर- महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या डॉ. सुजाता आसाराम साळवे (वय 53) यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.2) सकाळी उघडकीस आली.

डॉ. सुजाता साळवे या महापालिकेच्या तोफखाना आरोग्य केंद्रात आरोग्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी सावेडी उपनगरातील कोहिनूर मंगल कार्यालया मागील आसरा हौसिंग सोसायटीत असलेल्या त्यांच्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि.2) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. साळवे यांच्या आत्महत्येचे कारण दुपारी उशिरापर्यंत समजू शकले नाही. ही घटना समजताच महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त होत होती.