माजी सैनिकांनी रक्तदानाने साजरा केला संविधान दिन

अहमदनगर- माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्यावतीने संविधान दिनानिमित्त तपोवन येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबीरास प्रारंभ करण्यात आले. यामध्ये युवकांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे उपप्रदेशाध्यक्ष संतोष पवार, राजहंसचे चंपती मोरे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड, शिवाजी गर्जे, विजय तोडमल, बन्सी दारकुंडे, गुणाजी लोमटे, कुशल घुले, रमेश जगताप, संतोष मगर, नितीन बेडगे, राम पाटील, प्रकाश पावरा, अजय हंगरे, सतिष कुमार, शैलेश सुर्यवंशी, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. विलास मढीकर, डॉ. वसंत झेंडे आदी उपस्थित होते.

संतोष पवार म्हणाले की, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी उत्कृष्ट सामाजिक कार्य उभे केले आहे. रक्तदान ही काळाची गरज असून, रक्तदानाने एखाद्याचे जीव वाचणार आहे. या भावनेने रक्तदानासाठी युवक पुढाकार घेत आहे. डॉ.बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाने नागरिकांना मुलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. तर सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिवाजी गर्जे यांनी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. या शिबीरात 67 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. मेजर विजय तोडमल यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे सहकार्य लाभले.