श्री साईद्वारका सेवा ट्रस्ट व सिद्धेश्वर तरुण मंडळतर्फे गरजवंतांना मास्कचे वाटप

(छाया-लहू दळवी)

अहमदनगर – कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. कोरोना आजारापासून प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पालन करणे गरजेचे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना संसर्ग विषाणूने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आपण लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता झाल्यामुले नागरिक आपआपले व्यवसाय, नोकरीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोना संसर्गात वाढ होण्याची भीती वाढत आहे.

त्यामुळे प्रत्येकाला मास्क व सॅनिटायझरचे वापर करणे गरजेचे आहे. यासाठी माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझरेच वाटप करण्यात आले. श्री साईद्रारका सेवा ट्रस्ट व सिद्धेश्वर तरुण मंडळ यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

समाजातील गोरगरीब नागरिकांना मास्कचे वाटपप्रसंगी आ. संग्राम जगताप. समवेत राजू मामा जाधव, संजय झिंजे, शामराव रोकडे, दीनानाथ जाधव, निखिल लुणिया, राजेश गुगळे, चेतन अरकल, विनायक नेवसे, मितेष शहा, शिवदत्त पांढरे, राहुल मुथा, ज्ञानेश्वर दौंडकर, सचिन उदगिरकर, सचिन दिवाणे, स्वप्निल अंकम, तुकाराम रामगिरी, चैतन्य जाधव, आदिनाथ जाधव, सोमनाथ जाधव, प्रविण उदगिरकर, अक्षय संभार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अॅड. जाधव म्हणाले की, प्रभागातील विकासाबरोबर मंडळाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रमाला प्राधान्यक्रम दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दु:खात जाऊन काम करण्याची आमची पद्धत आहे. कै. कृष्णाभाऊ जाधव यांच्या शिकवणीप्रमाणे मी नेहमीच समाजामध्ये काम करत आहे. कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी गरजू लोकांना मोफत मास्कचे वाटप केले आहे. यापुढील काळातही समाजामध्ये असेच सामाजिक उपक्रम राबविले जातील, असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा