मनाची एकाग्रता प्रचंड आव्हानावर मात करण्याचे सामर्थ्य देते – गोपाळ पुराणिक

सहकारी बँकांतील लेखनिकांची कार्यशाळा संपन्न

अहमदनगर – हल्ली ऐकणेचे प्रमाण कमी होवून बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. जो उत्तम ऐकतो तो मनाची एकाग्रता उत्तम ठेवू शकतो मनाची एकाग्रता प्रचंड आव्हानावर मात करण्याचे सामर्थ्य देते, असे मत मराठवाडयातील जिंतूर येथील सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँकचे तज्ञ संचालक गोपाळ पुराणिक यांनी रिझर्व बँकेची केवायसी संकल्पना, अँटी मनी लॉंडिरिंग अॅक्ट या विषयाचे सोप्या भाषेत विश्‍लेषण करताना सांगितले.

अशिक्षितपणा, सुशिक्षितपणांच्या व्याख्या आता कालबाहय झाल्या असून कालचे तंत्रज्ञान आज शिकणारे अशिक्षित व आजचे तंत्रज्ञान आज शिकणारे सुशिक्षित अशी सदयस्थितीतील व्याख्या बनली आहे. त्यादृष्टीने बँकिंग क्षेत्रातील आजच्या तंत्रज्ञानाचे परिपूर्ण ज्ञान अदययावत ठेवले तरच हे क्षेत्र अधिक बळकट होईल त्यादृष्टीने सतर्क राहण्याचा निर्धार नागरी सहकारी बँकांतील लेखनिकांच्या कार्यशाळेत व्यक्त करणेत आला.

अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यशाळेतील सहभागी निरीक्षक प्रशिक्षणार्थी कार्यशाळेचे उद्घाटन अहमदनगर मर्चंट को-ऑप बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सुरेश फिरोदिया व वरिष्ठ अधिकारी सौ.राजश्री अल्लडवार यांचे हस्ते झाले.

औरंगाबादच्या देवगिरी नागरी सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण नांदेडकर यांनी ग्राहक सेवेचे महत्व विषद केले. घरपोच सेवेचे आश्‍वासन, माहिती मिळविण्याची अमर्याद साधने, व्याजदराचे प्रलोभन या बाबींबर बँकिंग क्षेत्रात ग्राहकामधील जागृती वाढली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीप्रमाणे ग्राहक हा परमेश्‍वर असून आपण देत असलेल्या सेवेमुळे ग्राहक परोपकारी होत नसून ग्राहकामुळे आपण परोपकारी होत आहोत. आपले पगार ग्राहकावर अवलंबून असतात यांची गांभीर्याने जाणीव ठेवण्याची जबाबदारी सेवकांवर असून नियमबाह्य कामांना नम्रमणे नकार दिला पाहिजे. ग्राहक सेवेची संस्कृती तयार करण्याची गरज प्रतिपादन करून श्री.नांदेडकर यांनी पैशाचे महत्व कधीच कमी होणार नाही बँकांवर सर्व सामान्यांचा प्रचंड विश्‍वास आहे ग्राहकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी योग्य सल्ला सेवकांनी दिला पाहिजे. ग्राहकांचे बँकेवरील प्रेमाचा व्यावसायिक उपयोग करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

अहमदनगर शहर सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अनासपुरे यांनी संतुष्ट ग्राहक, बँक व्यवसाय वृध्दी या विषयावर मार्गदर्शन केले. असोसिएशनचे उपाध्यक्ष नाथा राऊत यांनी स्वागत केले. कार्यलक्षी संचालक अशोक कुरापाटी यांनी आभार मानले.