साहित्य सहवास – ‘खोडरबर’

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी आलेला भाचा. मामानं, भाच्याला चित्र काढायला शिकवलं. भाच्याला चित्र काढणं आवडु लागलं. एके दिवशी भाचा चित्र काढु लागला. मामा कौतुकानं पाहु लागला. चित्र मनासारखं काढलं जाईना म्हणुन भाचा काढलेलं चित्र खोडरबरने खोडू लागला. त्याचा हा खोडण्याचा कार्यक्रम बराच वेळ चालला. शेवटी मनासारखं चित्र काढुन झालं. मामाला दाखवलं. मामानं, भाच्याला शाबासकी दिली. अ आणि ब दोघे मित्र. अ ला ब चा स्वभाव माहित आहे. ब, अ ला नेहमी, संपर्कात येणार्‍या व्यक्तींविषयी सांगतो.

अ, अरे तो आन्या जास्तच शहाणा आहे. तो रव्याना आघावच आहे. तो सुरेश खडुसच आहे. तो मन्या कायमच मला आडवा चालतो. प्रत्येकवेळी अ ने शांतपणे ऐकुन घेतलं. अ स्वतंत्रपणे अन्या, रव्या, सुरेश, मन्याला भेटला. ब विषयी चौघांनाही विचारलं. एके दिवशी ब, अ ला सुन्याविषयी सांगु लागला. अ ने त्याला थांबवलं. म्हणाला, ब, अमुक एक असा आहे, तमुक एक तसा आहे हे मला सांगण्यापेक्षा तू स्वतः कसा आहे, हे एकदा शांतपणे बसुन विचार कर. माझ्या माहितीनुसार तू कुणालाच चांगलं म्हणत नाहीस. कुणातच तुला चांगला गुण दिसत नाही. अन्या, रव्या, सुरेश, मन्याला मी भेटुन, तुझ्याविषयी विचारलं. ते चौघेही तुझ्याविषयी चांगलंच बोलतात भलेही तू त्या चौघांविषयी वाईट बोलत असलास तरीसुध्दा. मित्र म्हणुन माझं ऐक.

तुझ्या मनातलं त्यांच्याविषयीचं नकारात्मक चित्र सकारात्मक विचार मनात आणुन खोडून टाक. खोडरबर हातात असलं की चित्रातला नको असलालच भाग खोडायचा. आवश्यक असलेला भाग आपण मुद्दामुन खोडला की चित्र अर्थहिन होऊन जातं. मी तुला हे मुद्दामुन सांगतोय कारण चांगुलपण आपल्या प्रत्येकात आहे पण ते कुणीतरी दाखवुन द्यावं लागतं. तुझ्या सहवासात येणारांमध्ये तू, फक्त दोषच पाहात राहिलास तर तू नकारात्मकच होशिल. तुझ्या जीवनाचं चित्र अर्थहिन वाटु लागेल. माझ्या मनातल्या सुविचाराचं खोडरबर वापरुन तुझ्यातलं वाईटपण काढण्याचा प्रयत्न करतोय. तू वाईट वाटुन घेऊ नकोस. माझा मित्र म्हणुन मला वाटतं, माझ्या मित्राचं भविष्यरुपी चित्र उज्वल, चांगलं असावं. ब ला स्वतःची चुक लक्षात आली. त्याने अ ची गळा भेट घेतली.

शाळेत चित्रकलेच्या तासावेळी काढलेलं चित्र अथवा चित्रातला नको असलेला भाग काढण्यासाठी हातात, खोडरबर असतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण खोडरबर न वापरता, डोळ्यांव्दारे दिसणारं, मनात साठवतो. त्यावेळी मनात साठवतांना नको असलेली कृती, घटना मनातून काढण्यासाठी सकारात्मक विचारांचा अंगिकार अत्यंत महत्वाचा आहे. सकारात्मक विचारांचं खोडरबर बरंच चांगलं काम करत असतं. मुळात खोड आणि वाईट सवय हे एकाच अर्थाचे दोन शब्द.

समोरच्याची खोड अर्थात वाईट सवय आपण काढायचीच कारण त्याच्या त्या खोडीमुळं तो नकारात्मक होतो. पाटीवर पेन्सिलने काढलेलं चित्र आणि कोर्‍या कागदावर शिसपेन्सिलने काढलेलं चित्र अनुक्रमे हाताने आणि खोडरबरनं पुसता येतं, नाहीसं करता येतं. येथून पुढं खोडरबर पाहिलं की मनात सकारात्मक विचारांचं खोडरबर येणारच. खोडरबर पांढर्‍या रंगासह इतर रंगांचंही असतं. शिसपेन्सिलचं खोडणं हा त्याचा मुळ स्वभाव, हेच त्याचं कर्म. सुविचारांचं खोडरबर वापरुन मनातल्या नकारात्मक विचारांना नष्ट करुया. कराल ना?

सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार

अ.नगर. मो. 9822758383

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा