रूबी मेडिकल सर्व्हिसेस येथे गुरुवारी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर

अहमदनगर- नगरच्या तारकपूर परिसरातील रुबी मेडिकल सर्व्हिसेस (एम.आर.आय.सेंटर) येथे हृदयरोगावरील अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध आहेत. नगरसह राज्यातील रूग्णांना या सुविधांचा लाभ होत असून जास्तीत जास्त रूग्णांना या सेवेचा लाभ मिळावा यासाठी गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 ते 3.30 या कालावधीत होणा-या या शिबिरात नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रूग्ण तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सिनियर मॅनेजर संतोष दसासे यांनी दिली.

मोठ्या महानगरांप्रमाणेच नगरमध्येही अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी रूबी मेडिकल सर्व्हिसेस येथे विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्याच्या काळात हृदयविकारावर अधिक परिणामकारक उपचार शक्य झाले असून याठिकाणी प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर रूग्ण तपासणी व उपचारांसाठी उपलब्ध असतात.

सर्वच रूग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने आयोजित या विशेष शिबीरात तज्ज्ञांकडून मोफत हृदयरोग तपासणी केली केली जाणार आहे. याशिवाय पिवळे रेशनकार्डधारक रूग्णांवर पुण्यातील रूबी हॉल येथे मोफत अँजिओप्लास्टीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून रूग्णांनी 0241-2325648 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रुबी मेडिकल सर्व्हिसेस (एमआरआय सेंटर) च्यावतीने करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा