आरपीआय नगर जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार – जिल्हाध्यक्ष सुनील साळवे 

अहमदनगर – आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील महायुतीचे भाजपा व शिवसेना या पक्षाचे जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या सर्वांचा आयपीआयकडून प्रचार करून युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी सोमवारी (दि.14) दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार करणार आहेत. पक्षातील काही नाराजांची लवकरच नाराजी दूर केली जाईल. निवडणुकीत कार्यकर्ते आपली भुमिका मांडत असतात. परंतु निवडणूक कोणी लढवायची तो निर्णय पक्षाचे अध्यक्ष आठवले घेतात. त्यामुळे आम्ही आरपीआयचे सर्व पदाधिकारी नगर जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार आहोत, असे सुनिल साळवे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना भिंगार शहराध्यक्ष अमित काळे म्हणाले की, मागील आठवड्यात पक्षाचे अजय साळवे व इतरांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे काम करणार नाही असे जाहिर केले होते मात्र त्यांनी ही पत्रकार परिषद पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन घेतली नव्हती. पक्षाचा तसा कुठलाही आदेश नाही त्यामुळे पक्षाने जो युतीचा धर्म पाळायचा आदेश दिला आहे त्याचे पालन आम्ही करणार आहोत. याबाबत अनिल राठोड यांची भेट घेऊन तसे त्यांना सांगितले असल्याचेही अमित काळे यांनी सांगितले.

यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक गायकवाड, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, विजय भांबळ, शिवाजी साळवे, जितू ठोंबे, अमोल पाटोळे, सतिष साळवे आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा