अपघाताचा बनाव करुन रोकड पळविली

अहमदनगर- मोटारसायकलला धक्का लागल्याचा बनाव करुन पिकअप टेम्पो चालकास शिवीगाळ दमदाटी करीत त्यांच्याकडील 30 हजार रुपये बळजबरीने चोरुन नेल्याची घटना तारकपूर बसस्थानकाजवळील हॉटेल थापरच्या भिंतीलगत रविवारी (दि.1) 3.30 वाजता घडली.

याबाबतची माहिती अशी की, सलीम अब्दुल शेख (वय 28, रा.देवळाली प्रवरा, ता.राहुरी हल्ली रा.रेहमतपूर, संगमनेर) हे त्यांचा पिकअप टेम्पो (क्र.एम.एच.15, जी.व्ही.0241) ने नगरहून संगमनेरकडे जात असताना तारकपूर बसस्थानका जवळ पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी स्वाराने अडवून ‘तुझ्या गाडीचा माझ्या मोटार सायकलला धक्का लागला’ असे खोटे सांगून दवाखान्याचा खर्च भरुन दे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली आणि त्याच्याकडील 30 हजार रुपये काढून घेऊन पसार झाला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सलीम शेख यांच्या फिर्यादीवरुन भा.दं.वि.क. 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे.कॉ. केरुळकर हे करीत आहेत.