प्रवाशांना लुटण्याच्या तयारीतील टोळी पकडली

अहमदनगर- रात्री रस्त्याने जाणार्‍या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही कारवाई स्टेशन रोडवरील मल्हार चौकातील हॉटेल सन्मान लॉजजवळ शुक्रवारी (दि.9) पहाटे 1 च्या सुमारास करण्यात आली.

या कारवाईत विनोद सिद्देकर चव्हाण (वय 22, रा. गुंडेगाव, हराळवस्ती, ता.नगर), राहुल उर्फ रमेश बाळु पडवळ (वय 24, रा. निमगाव डावरे, ता. खेड, जि. पुणे), रामदास बबन कडाळे (वय 29, रा. निमगाव डावरे, ता. खेड, जि. पुणे), रामदास उर्फ किरण गोविंद खंडागळे (वय 25, रा. जवळके, ता. खेड, जि. पुणे) यांना अटक केली असुन त्यांच्याकडील लोखंडी कटावणी, लोखंडी गज, चाकु, लाकडी दांडके, मिरची पावडर, मोबाईल, गलुल, दगड असा सुमारे 1100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान त्यांचा एक अनोळखी सहकारी अंधाराचा फायदा घेवून पळुन जाण्यात यशस्वी झाला.

कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या प्रदीप लोखंडे या होमगार्डास माहिती मिळाली की, स्टेशन रोडवरील हॉटेल सन्मान जवळ काही तरूण संशयितरित्या दबा धरून बसलेले आहेत. या माहितीवरून लोखंडे याने सदर माहिती पो.नि. विकास वाघ यांना दिली. सदर माहिती मिळताच पो.नि. विकास वाघ, पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, चालक हे.कॉ. साबळे, पो.कॉ. प्रशांत पवार, पो. कॉ. सुजय हिवाळे यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली असता पोलिसांना पाहताच चौघेजण पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्या चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता रस्त्याने जाणार्‍या प्रवाशांना लुटण्याच्या इराद्याने दबा धरून बसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून पोलिसांनी त्यांची झडती घेवून त्यांच्याकडील 1100 रूपयांचे दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले व चौघांना अटक केली.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पो.कॉ. राजेंद्र थोरात यांच्या फिर्यादीवरून भादंविक 399, 402 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा