रस्ता लुटमार करणार्‍यास अटक

अहमदनगर- वाहनचालकांना अडवुन लुटणारी टोळी उघडकीस आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एकास मंगळवारी (दि.16) गुंजाळे येथुन अटक केली.

वांबोरी घाटातून पंकज नाबरिया (वय 35, रा.वांबोरी) यांना विकास बाळू हनवत (रा.कात्रड, ता.राहुरी), कृष्णा भानुदास शिंदे (रा.कात्रड), रवि बर्डे (रा.मोरे चिंचोरे, ता.नेवासा) यांनी मिळुन लुटले असल्याची माहिती एलसीबीच्या पोलिसांना मिळाली. लुटीतील मोबाईल प्रसाद बाबासाहेब चेडवल (वय 22, रा.गुंजाळे, ता.नगर) याला विकला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चेडवल यास गुंजाळे येथुन ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचा मोबाईल जप्त केला. पोलिसांनी त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन अन्य आरोपींचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. चेडवाल यास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या पथकातील हे.कॉ.मनोज गोसावी, पो.ना.रविंद्र कर्डिले, आण्णा पवार, संतोष लोंढे, सचिन अडबल, दिपक शिंदे, रवि सोनटक्के, पो.कॉ.पाथरुट, मेघराज कोल्हे, चालक हे.कॉ.संभाजी कोतकर यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा