रितेश हिरानंदानी याचे सी.ए.परिक्षेत यश

अहमदनगर – इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडियाच्यावतीने मे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या फायनल सी.ए. परिक्षेत रितेश हिरानंदानी हा उत्तीर्ण झाला. रितेश हा सिंधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुरेश हिरानंदानी यांचा मुलगा असून, रा.स्व.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व.हरुमल हिरानंदानी यांचा नातू आहे.

रितेश हिरानंदानी याने सावेडी येथील सी. एल. मध्यान असोसिएटस् यांच्याकडे आर्टिकलशिप पूर्ण केली. तसेच त्यास सीए संदिप देसर्डा व प्रसाद भंडारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तारकपुर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल व सारडा महाविद्यालयात त्याने शिक्षण पूर्ण केले. रितेशच्या या यशाबद्दल त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक तसेच समाजातून अभिनंदन होत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा