प्रवाह काळ्या तांदळाच्या शेतीचा

संबलपूर, सुंदरगढ, कंधमाल, कोरापुट आदी जिल्ह्यांमध्ये काळ्या तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. या सुगंधी आणि पौष्टिक अशा तांदळाची वाढती लोकप्रियता हे त्यामागील कारण आहे. अनेक पोषक घटक आणि औषधी गुणांमुळे हे तांदूळ लोकप्रिय बनत आहे. या तांदळाच्या शेतीचा शेतकर्‍यांनाही लाभ होत आहे. पारंपरिक भातशेतीपेक्षा पाचशे पट अधिक कमाई या काळ्या तांदळाच्या शेतीमुळे होऊ शकत असल्याने तेथील अनेक शेतकरी या तांदळाच्या शेतीकडे वळले आहेत. सध्या अन्यही अनेक राज्यांमधील सरकार या तांदळाच्या शेतीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देत आहेत. यासाठीचे बीज हे मणिपूरसारख्या ईशान्येकडील राज्यांकडून मागवले जाते.

भारतात सर्वात प्रथम आसाम, मणिपूरमधील शेतकर्‍यांनी 2011 मध्ये काळ्या तांदळाची शेती सुरू केली. कृषी विज्ञान केंद्राकडून तेथील शेतकर्‍यांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. सुमारे दोनशे शेतकर्‍यांनी ही शेती सुरू केली केली आणि हळूहळू ती ईशासन्येकडील राज्यांमध्ये लोकप्रिय झाली. आता ती ओडिशासारख्या अन्य शेजारी राज्यांबरोबरच पंजाबमध्येही लोकप्रियहोत आहे. या तांदळाची किंमत 250 रूपये प्रति किलोपासून सुरू होते. ऑर्गेनिक काळ्या तांदळाची किंमत तर 500 रूपये प्रतिकिलो आहे. अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला हा तांदूळ गंभीर आजार रोखण्यासाठीही गुणकारी असल्याचे मानले जाते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा