निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासाठी ….

जर आपण निवृत्त असाल आणि आपण नियमित उत्पन्नाचा मार्ग शोधत असाल तर इथे नमूद केलेल्या टिप्स कदाचित फायदेशीर ठरू शकतात. निवृत्तीनंतर आपण दहा लाख रुपयाचा ङ्गंड एकरक्कमी गुंतवण्याचा विचार करत असाल आणि मुदत ठेवीपेक्षा अधिक परतावा मिळण्याची इच्छा बाळगून असाल तर आपल्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

एसएसीएसएस उत्तम: आपल्या नियमित उत्पन्नासाठी सीनियर सिटिजन सेव्हिंग्स स्किम (एसएसीएसएस) चा वापर करु शकता. या योजनेत तिमाहीच्या आधारावर एक निश्‍चित व्याजदर दिला जातो. या अनुषंगाने मुदत ठेवीपेक्षा ही योजना फायदेशीर मानली जाते. सध्या एसएसीएसएसवर व्याजदर 8.7 टक्के दिला जात आहे. सरकार दर तीन महिन्याला व्याजदराची आकारणी केली जाते.

एसडब्ल्यूपीचा पर्याय : याशिवाय आपल्याला एसडब्ल्यूपीचा पर्याय देखील आहे. सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅनचा वापर करुन आपण नियमितरुपाने एक निश्‍चित रक्कम काढण्यासाठी शॉर्ट टर्म ड्यूरेशन डेट म्युच्युअल फंडमध्ये एसडब्ल्यूपीमध्ये सुरू करु शकता. एसडब्ल्यूपी योजना ही सुविधाजनक आहे. या माध्यमातून गुंतवणूकदार एक निश्‍चित रक्कम म्युच्युअल फंडमधून परत मिळवू शकतात. किती काळात किती पैसे काढायचे आहेत, याचाही पर्याय गुंतवणूकदारालाच निश्तिचत करावा लागतो. मासिक किंवा तिमाही आधारावरही योजनेची निवड करु शकता. मंथली योजना ही अधिक लोकप्रिय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परताव्यापेक्षा अधिक रक्कम काढू नये अन्यथा भांडवलात घट होत राहिल.

डायव्हर्सिफाइड इक्विटी: आपल्याला गुंतवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम ही डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडमध्ये गुंतवायला हवी. यातून आपला पोर्टफोलिओ हा महागाई दराला मागे टाकू शकतो. डायव्हर्सिफाइड इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) सुरू करू शकता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा