रेपो दर कपातीचा दिलासा

दरवर्षी देशातील उद्योगांसाठी फेस्टिव्ह सिझन हा मोठ्या आकांक्षांनी भरलेला असतो. या काळात ग्राहक नवीन खरेदीच्या मूडमध्ये असतात आणि त्याचा लाभ घेण्यासाठी उद्योजक तयार असतात. अर्थात या गोष्टीला रिअल इस्टेटदेखील अपवाद नाही. अलिकडेच आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी कपात केली आहे. त्याचा फायदा उत्सवाच्या काळात घरांची मागणी वाढण्यासाठी होईल अशी अपेक्षा रिअल इस्टेट बाळगून आहे. रेपो रेट आता 5.40 टक्क्यांवर आहे. त्यावर रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांने घसरण झाली आहे. त्याचा थेट परिणाम म्हणजे गृहकर्जदाराच्या हप्त्यात घट होईल. यामुळे उत्सवाच्या दिवसात घरांची विक्री वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मासिक हप्त्यावर परिणाम : जर आपण 20 लाखाचे कर्ज 20 वर्षासाठी 9.55 टक्क्यांने घेतले असेल तर यापूर्वी आपल्याला 18,708 रुपये हप्ता भरावा लागत होता. आता नव्या बदलामुळे व्याजदर 9.20 टक्के झाल्याने तो हप्ता 18,253 रुपये होईल. त्याचवेळी 30 लाखांच्या गृहकर्जासाठी 28 हजार 62 रुपये हप्ता भरावा लागत होता. तो आता 27 हजार 379 रुपये होईल. यानुसार 50 लाखांच्या कर्जावर 46 हजार 770 हप्ता भरावा लागत होता. आता तो 45, 631 रुपये होईल. रेपो रेट कमी झाल्याने ग्राहकांच्या खिशावरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु ग्राहकांकडे दोन पर्याय असतात. एक तर हप्ता कमी करणे किंवा कालावधी कमी करणे. हप्ता कमी करण्यापेक्षा कालावधी कमी करणे हे एका अर्थाने हिताचे ठरते.

वर्षभरात चौथ्यांदा कपात: आरबीआयने वर्षभरात चौथ्यांदा कपात केली आहे. ऑगस्टमध्ये 0.35 टक्क्यांवरून रेपो रेट 5.75 टक्के केला होता. त्यानंतर 5.40 टक्के करण्यात आला. त्यापूर्वी जूनमध्ये 0.25 टक्क्याने कपात करत 5.75 टक्के, एप्रिलमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करत 6 टक्के आणि फेब्रुवारीत 0.25 टकक्यांनी कपात करत रेपो रेट हा 6.25 टक्के केला होता.

तज्ञांचे मत: रिअल इस्टेटमध्ये मिड- सेगमेंटमध्ये मागणी वाढल्याने 0.35 टकक्यांची कपात खूपच कमी आहे, असे काहीत तज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात त्याचा लाभ हा परवडणार्‍या घरांच्या योजनेला होणार आहे. दुसरीकडे परवडणार्‍या घरांच्या मागणीत वाढ होत आहे. आगामी काळात त्याचे सकारात्मक चित्र दिसेल. टियर-2 आणि टियर-3 शहरातील किंमती कमी आहेत. त्यामुळे मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे निवासी सेक्टरमध्ये किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. बँकिंग सिस्टिममधील ग्रोथ देखील होईल. त्याचा थेट परिणाम रिअल इस्टेटवर होईल. अशा स्थितीत घर खरेदीचा हा योग्य काळ आहे. कारण सध्या व्याजदर दहा ते साडे नऊ टक्क्यांच्या खालीच आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा