पूरग्रस्तांना मदतीचा हात देवू या…. एक पणती आपणही पेटवू या..

राष्ट्र सेवा दल, अहमदनगर शहर तर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

अहमदनगर- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमधून व शहरातून पुराने थैमान घातले आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे खाण्याच्या वस्तु, कपडे, अंथरूण, पांघरूण वापरण्याजोगे राहिले नाहीत. राष्ट्र सेवा दलाचे मिरज, सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील कार्यकर्ते गेले काही दिवस पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामात सक्रीय आहेत. याठिकाणी राष्ट्र सेवा दलाने छावण्या उभारून त्यांच्या राहण्याची, खाण्याची व त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची सोय केली आहे .

या पुरग्रस्तांना मदत पोहचावी म्हणून राष्ट्र सेवा दल, नगरच्यावतीने पूरग्रस्त बांधवांना तातडीची मदत म्हणून नगर मधील नागरिकांना खालील वस्तू पाठविण्याचे आवाहन अहमदनगर राष्ट्र सेवा दलाच्यावतीने करण्यात आहे.

देणगी म्हणून आपण खालील वस्तू देऊ शकता जीवनावश्यक वस्तू – मेणबत्त्या, नवीन ब्लँकेट्स, नवे टॉवेल, शॉल, बेडशीट, चप्पल, शूज, मुलांसाठी वह्या, पेन, वॉटर बोटल, कंपास बॉक्स, अन्न प्रकार साहित्य – बिस्किटे, पॅक करुन तांदुळ, गहू, डाळी, साखर, पीठ, हळद, मसाले, तेल शक्यतो पॅकेज्ड फूड औषधे – डेटॉल, मॉस्किटो रिपेलंट, सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, मेडिक्लोर, क्रोसीन, ग्लोव्ज, फेस मास्क, पॅरासिटेमॉल, ग्लुकोज पावडर, ओ आर एस/ इलेक्ट्रॉल, दैनंदिन स्वच्छता टूथब्रश, पेस्ट, साबण (अंगाचा व धुण्याचा), झाडू, फिनेल, डिटर्जंट पावडर, हार्पिक, ज्यांना रोख पैसे द्यायचे आहेत त्यांनी खालील लोकांकडे किंवा खाली दिलेल्या खात्यावर पैसे जमा करावेत.

मदत देण्यासाठी सुप्रिया मैड- 8623710335, बापू जोशी – 9273345206, अनघा राऊत – 9763715722, गोविंद आडम – 9423520657 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच पुढील संकलन कद्रांवर ही मदत स्वीकारली जाईल. 1) विझार्ड कॉम्प्यूटर्स शकुंतला अपार्टमेंट, 1 ला मजला, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, नगर. फो. नं. – 9763715722, 2) सुरवि डिजिटल लॅब, जिल्हा वाचनालय, चितळे रोड, नगर. फो.नं. -9890486510, 3) न्यू टाईम्स स्टील फर्निचर, गजराज हॉटेल शेजारी, बालिकाश्रम रोड, नगर. फो. नं. -7276499949, 4) योगा क्लासेस, सौ. बालवे मॅडम, श्रीराम चौक, श्री मेडिकल समोर, नगर. फो.नं. -75881 70440

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा