रमेश तरटे यांचे दिर्घ आजाराने निधन

अहमदनगर- पुणे येथील स्वकुळ साळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, स्वकुळ समाचार व जिव्हेश्‍वर समाचार मासिकाचे आधारस्तंभ आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातून कार्यालय अधिक्षक म्हणून निवृत्त झालेले रमेश शिवाजीराव तरटे (वय 68) यांचे पुण्यात दिर्घ आजाराने 16 सप्टेंबर रोजी पवार हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

धनकवडी येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर, नगर, कोल्हापुर, पुणे आदि जिल्ह्यातून त्यांचे सहकारी मित्र, अप्तेष्ट हजर होते.

नगरचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे यांचे ते मावसकाका होत. कै. रमेश तरटे यांनी करमाळा, नगर, शिरुर, अकलुज, पुणे, कोल्हापूर येथे बांधकाम खात्यात लोकप्रिय अधिकारी म्हणून काम केले. त्यांच्या मागे दिनेश व योगेश हे दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे, विवाहित दोन बहिणी, बंधू असा परिवार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा