सहारा न्यू रायझिंग हेल्पलाईन फाउंडेशनच्यावतीने हज यात्रेकरू व गुणवंत पाल्यांचा सन्मान

अहमदनगर- सहारा न्यू रायझिंग हेल्पलाईन फाउंडेशनच्यावतीने नुकताच हज यात्रेला जाणारे हाजी सय्यद अहमद अफजल, हाजी मोहम्मद हनीफ गफ्फार शेख, हाजी सईद हनीफ शेख यांचा, तसेच फाउंडेशनच्या सभासदांचे पाल्य डॉ. जुनेद हनीफ शेख यांनी एमबीबीएस परीक्षेत उत्तम गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल व जुनेद समीर मन्यार यांनी 12 वीच्या परीक्षेत 79% गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी हमीद पटेल, हबीब मन्यार, इस्त्राईल पठाण, आतीक शेख, राजू शेख, युसूफ बागवान, फय्याज शेख, अबुगर पठाण, निजाम पठाण, नूरआलम शेख, वसीम सय्यद आदींसह सर्व सभासद उपस्थित होते.

फाउंडेशनच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते. कुठल्याही प्रकारचे व्याज व नफा न घेता फाउंडेशनचे काम चालू आहे. सभासदांच्या डोनेशनमधून गरीब व अनाथ मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी व त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत केली जाते. स्कॉलरशीप दिली जाते.

बचतगटाची स्थापना करून बचतगटाच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक मदतही केली जाते.

फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात असून, फाउंडेशनचे काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे, अशी माहिती हनीफ पटेल यांनी दिली. यावेळी उपस्थितांनी पवित्र हज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा