रगडा ऑन टोस्ट

साहित्य – 2 कप पांढरे वाटाणे, 1/4 चमचा खायचा सोडा, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे टोमॅटो, 1 चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला 1 चमचा, 1 मोठी वेलची, 2 लवंगा, दालचिनी 1/2 इंचीचा तुकडा, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा लिंबाचा रस, 8 ब्रेडचे स्लाईस.

कृती – वाटाण्यांना रात्रभर भिजत ठेवावे. कुकरमध्ये पाणी, लवंग, दालचिनी, मोठी वेलची आणि 1/2 चमचा मीठ टाकून गळेपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर उकळलेल्या वाटाण्यांमधून लवंगा, दालचिनी आणि मोठी वेलची वेगळी काढून घ्यावी.

त्यात कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ इत्यादी सामग्री टाकून मिश्रण एकजीव करावे. रगडा (भाजी) तयार आहे. आता टोस्टरमध्ये ब्रेड भाजून त्यावर थोडीसी भाजी आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.