राधाबाई काळे महाविद्यालयास रुपाली चाकणकर यांची भेट

अहमदनगर – महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर या गेल्या आठवड्यात नगरमध्ये आल्या असता त्यांनी येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालय येथील मुलींसोबत संवाद साधून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले.

महाविद्यालयाचे प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी महाविद्यालयात दूरदृष्टीने केलेल्या विविध सुधारणांची त्यांनी पाहणी केली. मुलींसाठी अद्ययावत लायब्ररी, वसतिगृह, पाणी, पार्किंग, वर्ग पाहून समाधान व्यक्त केले. मुलींसाठी या महाविद्यालयात खास व्यायामशाळा (जिम) केल्याचे पाहून सौ. चाकणकर यांनी प्राचार्यांचे कौतुक केले.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अशोकराव बाबर, क्रीडा शिक्षक विजय म्हस्के यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, रयत शिक्षण संस्थेचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा