मनोविकार समजणार आजारावरूनच

सध्याचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. त्याचा अनेक क्षेत्रांमध्ये विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात खुबीने वापर केला जात आहे. एखादी व्यक्ती भविष्यात मनोविकाराला बळी पडेल का, हे आता त्याच्या आवाजावरूनच कळू शकेल. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने युक्त अशी एक यंत्रणा करण्यात आली आहे जी आवाजाचे विश्लेषण करते. ती संबंधित व्यक्तीच्या बोलण्यात, भाषेत लपलेले काही संकेत समजून घेऊ शकते व त्याच्या आधाराने भविष्यात होणा-या मानसिक आजारांची माहिती देऊ शकते.

अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील संशोधकांनी ही यंत्रणा विकसित केली आहे. एनपीजे सिझोफ्रेनिया जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्सने युक्त असलेली ही सिस्टीम भाषेतील दोन प्रकारच्या शब्दांचे विशेष करून विश्लेषण करते. पहिला शब्द असा असतो की ज्याचा एखादी व्यक्ती सर्वाधिक वेळा आणि सर्वात मोठ्या आवाजात वापर करते.

दुसरे शब्द असे की जे संबंधित व्यक्तीकडून स्पष्टपणे उच्चारले जात नाहीत. त्याच्या आधारे ही यंत्रणा भविष्यात होणार्या मानसिक विकारांची 93 टक्क्यांपर्यंत अचूक माहिती देते. नेगुइन रेजाई नावाच्या संशोधकाने सांगितले की हे नवे तंत्र अतिशय संवेदनशील असून ते अशा पॅटर्नचा छडा लावते की जे आपण सहजपणे पाहू शकत नाही. हे एकप्रकारे एखाद्या सूक्ष्मदर्शकासारखेच असून ते आजारांबाबत आधीच सावध करते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा