प्रोटेस्ट कॅन्सरवर ‘लाल’ उपाय

जगभरात ‘टोमॅटो’चा वापर केला जातो. हे फळ कोणत्याही ऋतूमध्ये सहजपणे उपलब्ध होते. टोमॅटोमध्ये भाजी अथवा अन्य अन्नपदार्थांची चव तर वाढतेच, याशिवाय ते आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. टोमॅटोमध्ये नैसर्गिकरीत्या ‘व्हिटॅमिन’ आणि ‘मिनरल्स’चे प्रमाण भरपूर असते. टोमॅटोमध्ये अनेक असे घटक आहेत की, ते कॅन्सरसह अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास मदत करतात. टोमॅटोमध्ये ‘लाईकोपिन’ नावाचे एक रसायनही आढळते. हेच रसायन कॅन्सरचा कोशिकांना नष्ट करण्यास उपयुक्त ठरते. याशिवाय या लाल फळात ‘लाईकोपिन’सह ‘बीटा कॅरोटिन’ हे घटकही असतात. जे लोक आठवडाभरात किमान 10 अथवा त्यापेक्षा जास्त टोमॅटो खातात त्यांना ‘प्रोस्टेट कॅन्सर’ होण्याचा धोका कमी असतो, असे संशोधकांचे मत आहे.

हृदयविकारावही टोमॅटो फारच गुणकारी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि कोलिन हे घटक आढळून येतात. जर तुम्हाला पोटॅशियम जास्त प्रमाणात हवे असेल तर सॅलडच्या रूपात जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन केल्यास पोटॅशियम मिळते.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे आढळले की, जे लोक रोज सुमारे 4039 एमजी पोटॅशियमचे सेवन करतात, त्यांना हृदयासंबंधीचा आजार होण्याचा धोका 49 टक्क्यांनी कमी असतो. लालबरोबरच हिरवे टोमॅटोही तितकेच गुणकारी आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा