प्रियदर्शनी पब्लिक स्कुलची क्रीडा क्षेत्रात विजयी भरारी

अहमदनगर – प्रियदर्शनी पब्लिक स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात विजयाची भरारी मारली.

रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन येथे 7 रोजी ’मल्लखांब’ या खेळामध्ये प्रियदर्शनी पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवून विभागीय स्तरावर निवड मिळविली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक – कु.संजना संजय कोंगे विद्यार्थिनी यु-17, यु-17 द्वितीय क्रमांक- कु.उत्कर्षा बाळासाहेब खोमणे यांनी पटकावला तसेच यु-14 मध्ये द्वितीय क्रमांक कु.गौरवी वाळुंजकर व कु.अमृता तळेकर यांनी पटकावला. विद्यार्थ्यांमध्ये यु-17 मध्ये कु.अतिश घाटविसावे व वेदांत बिंदे यु-17 मध्ये विशाल संजय कोंगे याने पटकावला व विभागीय स्तरासाठी वरील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्या स्पर्धा सोलापूर येथे होणार आहे.

तसेच राष्ट्रीय कॉर्फबॉलच्या हरियाना येथे झालेल्या स्पर्धेत अहमदनगरमधून प्रियदर्शनी पब्लिक स्कुलची विद्यार्थिनी कु.वैष्णवी आदिनाथ पवार हिने उत्कृष्ट सहभाग नोंदविला होता.

सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी शाळेचे संस्थापक बाळासाहेब खोमणे व सौ. शोभा खोमणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.योगिता पवार तसेच मार्गदर्शक कोच गणेश वाळुंजकर सर व प्रफुल्ल वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.