प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे क्रीडाक्षेत्रात भरघोस यश

भिंगार- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर अंतर्गत जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा 6 रोजी श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे पार पडली. त्यामध्ये प्रियदर्शनी पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील U – 17 चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यामध्ये कु. श्रावणी पांढरे प्रथम क्रमांक, यश गुळवणे द्वितीय क्रमांक व अथर्व तनपुरे याने चतुर्थ क्रमांक पटकावला. ह्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली.

यावेळी शाळेचे संचालक बाळासाहेब खोमणे, मुख्याध्यापिका सौ. योगिता पवार तसेच क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक किशोर बेरड यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व यशसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा