मुदतीपूर्वी पॉलिसी बंद करताय?

भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इर्डा) ने यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. अर्थात हे नवीन बदल लवकरच लागू होऊ शकतात. या बदलामुळे विमाधारकाला सात वर्षापर्यंतची सक्रिय असलेली पॉलिसी अचानक बंद करायची असल्यास 90 टक्क्यांपर्यंत रक्कम हाताशी पडणार आहे.

नवीन नियमानुसार बाजाराशी निगडीत जीवन विमा योजनेतील पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्यास मिळणारी रक्कम ही वार्षिक हप्त्याच्या सात टक्क्यापेक्षा कमी होणार नाही. यापूर्वी दहा टक्क्यांपर्यंत रकक्कम कमी असायची. तज्ञांच्या मते, विमा रक्कम कमी होत असल्याने मोर्टेलिटीचा खर्च देखील कमी राहणार आहे. यातून अधिक गुंतवणूक होईल आणि चांगला परतावा मिळेल.

एकल प्रीमियम उत्पादनाव्यतिरिक्त किमान डेथ बेनिफिट हा एकूण विमा रक्मेच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही. या बदलामुळे विमा पॉलिसीत लवचिकता आली आहे आणि त्यास गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणून पाहिले जाईल.

पॉलिसी पाच वर्षांपर्यंत

बाजाराशी निगडीत बंद असलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याचा कालावधी हा इर्डाने दोन ते तीन वर्षांपर्यंत आणि पारंपारिक विमा उत्पादनासाठी पाच वर्षाचा केला आहे. जर एखादी लिंक्ड पॉलिसी पुन्हा सक्रिय करायची असेल तर तीन वर्षाच्या आत पुन्हा सुरु करण्याची मूभा इर्डाने दिली आहे. जर एखादा यूलिप विमा पॉलिसीसमवेत रायडर घेत असेल तर त्याचा पैसा एनएव्हीप्रमाणे न कापता तो पैसा हप्त्यातून वसूल केला जाईल.

पेन्शन योजनांतही लाभ

इर्डाने पेन्शनशी निगडीत विमा योजनांना एनपीएसच्या समकक्ष आणले आहे. ग्राहक आता पेन्शन योजनेतून काही अंशी पैसे काढू शकणार आहेत. आपत्कालिन स्थितीत 25 टक्क्यांपर्यंत रक्कम ग्राहकांना काढता येणार आहे.

विमाधारक 60 टक्के पैसे काढून उर्वरित रक्कम अॅन्यूटी योजनेत मनाप्रमाणे गुंतवणूक करू शकतो. तज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षात विम्याच्या पेन्शन योजनेतील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे.

कारण तुलनेने एनपीएस, पीपीएफ योजनेतून पैसे काढणे आणि अन्य लाभ अधिक आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांची पेन्शन योजना एनपीएसच्या समकक्ष आणल्याने गुंतवणुक वाढण्याची शक्यता आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा