नगरमध्ये पोलीस व सैन्य भरतीचे 17 रोजी मोफत मार्गदर्शन

अहमदनगर- महाराष्ट्रात लवकरच होणार्‍या पोलीस व सैन्य भरतीसाठी शनिवार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय स्वास्तिक चौक येथे पहिल्यांदाच मोफत पोलीस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये पोलीस भरतीचा बदललेला जी.आर व नवीन झालेल्या बदलांना कसे सामोरे जावे? यावर मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच बदललेली कागदपत्रे, भरती होण्यासाठी अचूक जिल्हा कसा? व कोणता निवडावा? लेखी मैदाणी आदी प्रत्येक घटकातील बारकावे व बदल यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. उमेदवारांनी मैदानीचाचणी, लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेण्याचा प्रयत्न कसा करावा. याचे मार्गदर्शन सह्याद्री करिअर अकडमी संचालक उमेश रुपनवर करणार आहेत. एकंदरीत बदललेल्या पोलीस भरती व सैन्य भरती प्रक्रियेला सामोरे जाताना हमखास यशस्वी कसे व्हावे, याचा कानमंत्र या कार्यशाळेत दिला जाणार आहे.

पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या उमेदवारांनी या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस भरती पुस्तकाचे लेखक उमेश रुपनवर यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा