भांडणात मध्यस्थी करणार्‍या पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न

अहमदनगर – दोन गटात आपापसात होणार्‍या भांडणात मध्ये पडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसावरच एकाने तलवारीने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (दि.12) सायंकाळी 5 वा. घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या कांबळे यांच्या कपड्याच्या दुकानात काही तरुणांनी घुसून शिवीगाळ व दमदाटी करत नासधुस केली. त्याचवेळी गावातील अन्य तरुणांनी एकत्र येवुन नासधुस करणार्‍यांना अटकाव केला. यावेळी दोन्ही गटात भांडणे सुरु झाली. त्यावेळी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे हे.कॉ. राजेंद्र पवार व पोलिस कॉ. योगेश राऊत हे तरुणांना समजावून सांगत भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करु लागली. त्यावेळी एकाने पवार यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. व त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत तुम्ही येथुन निघून जा असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी हे.कॉ.राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरुन सनी जाधव, राजू नागले, प्रशांत नागले, रविंद्र चंद्रभान बोडखे, गौतम कापसे, हर्षल बोडखे, विठ्ठल जाधव, गोविंद रणनवरे, रवि रणनवरे, अमोल रणपिसे, दिगंबर साठे व अन्य एका अनोळखी व्यक्तीविरोधात भादविक 307, 353, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 सह आर्म अॅक्ट 4/25, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) (3) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागलोत हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा