साहित्यप्रेमी मित्रमंडळातर्फे राज्यस्तरीय स्वरचित खुली कविता लेखन स्पर्धा

पुणे- सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील साहित्यप्रेमी मंडळातर्फे राज्यातील प्रतिभावंत नवोदित कवी/कवयित्री व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी विविध विषयावर स्वरचित राज्यस्तरीय खुली कविता लेखन स्पर्धा-2019 आयोजित करण्यात आली आहे.

उत्कृष्ट कवितेसाठी पुढीलप्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम 20 हजार रुपये रोख, द्वितीय 15 हजार रुपये रोख, तृतीय 10 हजार रुपये रोख, चतुर्थ 5 हजार रुपये रोख, पाचवे 3 हजार रुपये रोख तसेच या बक्षिसांसोबत स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देण्यात येईल.

तसेच निवडक 500 कवितांचा समावेश ‘काव्यसुगंध’ या राज्यस्तरीय प्रातिनिधिक कवितासंग्रहात करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या 2 स्वरचित कविता (टाईप केलेली) संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी, फोटोसह 20 जूनपर्यंत पाठवायच्या आहेत.

राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार-2019 साठी राज्यातील प्रतिभावंत लेखक, कवी, साहित्यिकांनी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी साहित्य पाठवावे.

राज्यस्तरीय जीवन साधना पुरस्कार-2019 साठी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांनी प्रस्ताव पाठवावेत.

यासाठी दर्जेदार सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा, कृषी, वैद्यकीय आदी क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांनी 20 जूनपर्यंत संपूर्ण माहिती, फोटो, भ्रमणध्वनीसह ई-मेल आयडीवर पाठवावी.

पत्रव्यवहार प्रा. हनुमंत वि. माने, संस्थापक अध्यक्ष, साहित्यप्रेमी मित्रमंडळ, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे-412305, मो. 8329252962, 9665009740, [email protected]

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा