पिझा

साहित्य:

पिझा ब्रेड साठी :

२५० ग्राम मैदा, १० ग्राम खमीर,१ छोटा चमचा साखर,

४) ४ लहान चमचे तूप, १/२ छोटा चमचा  मीठ

मसाल्यासाठी : १/२ किलो टोमेटो, २ कांदे, ४ काळी लसून, १ तुकडा आले, १ ढोबळी मिरची, १ कप बारीक चिरलेली पत्ता कोबी, मीठ चवीनुसार, १/२ चमचा लाल मिरची पावडर, १/४ लहान चमचा गरम मसाला , १ लहान चमचा साखर, १ लहान चमचा कोर्नफ्लोवेर, १०० ग्राम चीज

कृती:

१) मैद्यात मीठ साखर व खमीर टाका व तूप आणि पाणी टाकून माळून घ्या.

२) अर्धा तास ठेवल्यानंतर त्याचे ४ लहान गोळे तयार करा १० मिनिट १-१ करून चारी पोळ्या भाजून घ्या

३) टोमेटो, कांदा, आल, लसूण बारीक चिरून एका कढईत टाकून भाजून घ्या.

४) पूर्ण पाणी शिजल्यावर लाल मिरची पावडर, साखर, मीठ, व गरम मसाला टाका.

५) एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्याच्यात कोर्नफ्लोवर, टाका. हे मिश्रन ग्यासवारील टोमेटोच्या मिश्रणात टाका.

६) मिश्रण जाडसर झाल्यावर  त्याच्यात ढोवली मिरची व गाजर बारीक चिरून टाका.

७) २ मिनिटे भाजून ग्यास बंद करा.

८) आता पिझा बेसवर हे मिश्रण पसरून त्याच्यावर चीज किसा.

९) हि ब्रेड ओव्हन मध्ये १५०’० ला ७ ते ८ मिनिटे ठेवा टोमेटो सॉस टाका.

१०) खाण्याच्या सोयीकरिता चाकूने चिरून लहान लहान तुकडे करा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा