श्रमदानाला लोकसहभागाची जोड हवी-दिपाली भोसले-सय्यद

अहमदनगर – पाणी फौडेशनच्या स्पर्धेत बक्षीस मिळवण्याकरिता श्रमदान करू नका तर स्वत: व आपल्या कुटुंबाकरीता श्रमदान करा. कोणाकरिता काही करू नका तर आपल्या भावी पिढीच्या भविष्याचा विचार करा. तुम्ही एकत्र आला तरच तुमचे गाव सुधारेल, गावाची पाण्याची समस्या मिटेल. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याकरिता यांची अत्यंत गरज आहे ही गरज ओळखून प्रत्येकाने एक तरी फावडं मारावे तरच उद्याचा काळ चांगला राहणार आहे. जे श्रमाचे दान तुम्ही करत आहात, त्याला लोकसहभागाची जोड द्या तरच गावाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाची महिला जिल्हाध्यक्षा दिपाली भोसले-सय्यद यांनी केले.

नगर तालुक्यातील रांजणी या गावात पाणी फौंडेशनचा चालू असलेला श्रमदान प्रकल्पाला सिनेअभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाची महिला जिल्हाध्यक्षा दिपाली भोसले सय्यद यांनी भेट देऊन श्रमदान केले. येथील काम पाहून हे गाव दत्तक घेतले. यावेळी सरपंच बाळासाहेब चेमटे, सह्याद्री मल्टी निधी बँकेचे अध्यक्ष संदीप थोरात, संगीता लिंपणे, शुभांगी थोरात, कांता बोठे आदी उपस्थित होते.

दिपाली भोसले पुढे म्हणाल्या की, रांजणी हे गाव 1600 लोकांची वस्ती असलेले गाव असून खूप गोष्टीची कमतरता आहे. या लोकांच्या अनेक समस्या आहेत परंतु एवढे असूनही हे काम करत आहे. 1600 घरातील कुटुंबाकरिता मी हे गाव दत्तक घेऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणण्याचे काम करणार आहे.

बाळासाहेब चेमटे म्हणाले की, रांजणी हे छोटेसं गाव आहे. बचत गटांच्या महिलांमुळेच हे शक्य झाले आहे. महिलांनी मनावर घेतले म्हणूनच हे काम होत आहे. दिपाली सय्यद-भोसले सारख्यांनी लक्ष दिले तर गाव जिवंत राहू शकते. या गावाकडे जास्त कोणी लक्ष देत नाही. दिपाली भोसले यांनी गाव दत्तक घेतल्याने येथील अनंत अडचणी दूर होण्यास मदतच होणार असून, आम्ही करत असलेल्या कामाची पावती असून यामुळे अजून जोमाने काम करण्याची ताकद आम्हाला मिळाली आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ, तरुण वर्ग व गावातील श्रमदान करण्यास आलेली सव महिला व पुरुष वर्ग आणि ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन टीम, बास्को ग्रामीण विकास संस्थेचे अधिकारी व टाटा पॉवरचे अधिकारी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा